आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा, विरोधक आक्रमक होणार?, यासह जाणून घ्या मोठ्या घडामोडी
VIDEO | आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा होणार, विरोधक आक्रमक होण्याची शक्यता तर शेतकऱ्यांवरूनही होऊ शकते चर्चा..
मुंबई : मनसैनिकांवर भोंगे प्रकरणावरून राज्यभर केसेस केल्यात, मनसेच्या वाटेला गेले आणि मुख्यमंत्रीपद गेलं असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. तर मनसे भाजपाच्या दावणीला बांधला गेला आहे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. ६० वर्ष राज्य केलेल्या काँग्रेसची अवस्था बघा, भरतीनंतर ओहटी येणार भाजपला राज ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला आहे. तर आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. विरोधक आक्रमक होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवरूनही होऊ शकते चर्चा…शिंदे-फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे लवकरच निवडणुका होऊ शकतात, असे संकेत देत आदित्य ठाकरे यांनी केलं भाष्य … यासह बघा आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Published on: Mar 10, 2023 07:48 AM
Latest Videos