आम्हाला आरोप करायची गरज नाही; पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकार सुनावलं

आम्हाला आरोप करायची गरज नाही; पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकार सुनावलं

| Updated on: Apr 06, 2023 | 9:38 AM

काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकार आणि सरकारमधील आमदार, मंत्री यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी, वैफल्य ग्रस्त कोण झालं आहे? हे टीका करणाऱ्यांना आम्हाला सांगण्याची गरज नाही.

भंडारा : शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमधील आमदार, मंत्री हे उद्धव ठाकरे यांच्यासह मविआवर सतत टीका करत असतात. तसेच मविआ आणि ठाकरे हे वैफल्य ग्रस्त झाले आहेत. त्यातूनच ते आमच्यावर आणि सरकारवर टीका करत असतात असे आरोप केले जात आहेत. या आरोपावरून काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकार आणि सरकारमधील आमदार, मंत्री यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी, वैफल्य ग्रस्त कोण झालं आहे? हे टीका करणाऱ्यांना आम्हाला सांगण्याची गरज नाही. कोणी खोट सांगून तुम्ही अनेक आमदारांना फोडले? हे आधी पहा. तुमच्याबरोबर जे आमदार आहेत त्याचं आधी मत काय आहे हे पहावं. वैफल्य ग्रस्त आम्ही नाही. तर भाजप झाली आहे. ते सत्ते शिवाय ते राहू शकत नाहीत. ऐण केन सत्ता कशी मिळवता येईत, त्यातून पैसा आणि परत त्याच पैशातून सत्ता कशी मिळवता येईल हे काम भाजप करत. खोक्यांच विचार त्यांच्या डोक्यात आहे. त्यामुळे ही त्यांची मानसिकता आहे, आमची नाही.

Published on: Apr 06, 2023 09:16 AM