ही सर्व नाटकं सहानुभूतीसाठी, दीपक केसरकर यांनी काय केला उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार?
VIDEO | पण तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीची गुलामगिरी मान्य होती, दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
मुंबई : आमदार आणि खासदार तुम्हाला सांगत होते, आपण काँग्रेस राष्ट्रवादीसोबत नको राहिला, ते शिवसेना संपवायला निघालेत. तेव्हा तुम्ही हे सांगणाऱ्यांचा अपमान केला. ज्यावेळी ठाकरे गटात असताना आम्ही सांगितले जे शिंदे गटात गेले त्यांनी घेऊन येतो तर तुम्ही म्हणाले जे गेले तर त्यांना जाऊदे. किती वाईट बोलताय, या सगळ्या चुका केल्यात. हिंदुत्वाच्या मुद्यावर आणि विचारांवर रहा असे आम्ही सांगत होतो, पण तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीची गुलामगिरी मान्य होती, असे म्हणत शिंदे गटाचे नेते दिपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला तर हे सर्व नाटकं सहानुभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची सुरू असल्याचे म्हणत खोचक टीकाही शिंदे गटाचे नेते दिपक केसरकर यांनी केली.
Published on: Feb 18, 2023 05:57 PM