World Cup Match तिकीटाच्या नावाखाली शिंदे गटाच्या नेत्याच्या बायकोला लावला चुना; किती लाखाचा फटका?

World Cup Match तिकीटाच्या नावाखाली शिंदे गटाच्या नेत्याच्या बायकोला लावला चुना; किती लाखाचा फटका?

| Updated on: Nov 23, 2023 | 1:41 PM

सर्वाधिक सामने जिंकल्यानंतर मात्र अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या पदरात दारूण पराभव पडला. यानंतर देशभरातील क्रिकेटप्रेमी भारतीयांची मोठी निराशा झाली. या स्पर्धेदरम्यान, वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट देतो असे सांगत शिंदे गटातील नेते कुणाल सरमळकर यांची पत्नी पल्लवी सरमळकर यांना घातला गंडा

मुंबई, २३ नोव्हेंबर २०२३ : नुकतीच वर्ल्डकप २०२३ स्पर्धा पार पडलीय. वर्ल्डकप २०२३ च्या अंतिम स्पर्धेत भारतीय संघाचा पराभव झाला. सर्वाधिक सामने जिंकल्यानंतर मात्र अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या पदरात दारूण पराभव पडला. यानंतर देशभरातील क्रिकेटप्रेमी भारतीयांची मोठी निराशा झाली. या स्पर्धेदरम्यान, वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट देतो असे सांगत शिंदे गटातील नेते कुणाल सरमळकर यांची पत्नी पल्लवी सरमळकर यांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या तिकिटासाठी सरमळकर यांना तब्बल 35 लाख रूपयांचा गंडा घालण्यात आला. घडलेल्या या प्रकारानंतर नेते कुणाल सरमळकर यांची पत्नी पल्लवी सरमळकर यांनी पोलिसांत धाव घेतली आणि सर्व काही प्रकार पोलिसांच्या कानावर घातला आणि तक्रार दाखल केली.  या प्रकरणामध्ये सौरभ निकम आणि व्यंकट मंडाला हे दोषी आढळले, यामधील सौरभ निकम मीरारोड या ठिकाणी पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Published on: Nov 23, 2023 01:40 PM