अरे ऐक रे… तुझी इच्छा असेल तर… शिंदे गट अन् ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये ‘कोट’वरून जुंगलबंदी
आजपासून राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झाले असून सभागृहात जाण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झालेत. तर सभागृहात जाण्यापूर्वी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यात चांगलीच जुंपली
नागपूर, ७ डिसेंबर २०२३ : आजपासून राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झाले असून आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज संपलं. मात्र सभागृहात जाण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झालेत. तर सभागृहात जाण्यापूर्वी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यात चांगलीच जुगलबंदी झाल्याचे पाहायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी महादेवा मला मंत्री करा असं साकडं घालणाऱ्या आमदार भरत गोगावले यांना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी डिवचल्याचं पाहायला मिळालं तर वैभव, तू आमच्याकडे ये, अशी थेट ऑफरच भरत गोगावले यांनी वैभव नाईक यांना दिल्याचे पाहायला मिळले. अधिवेशन संपताना मी वैभवला सांगतो आणि वैभवची इच्छा असेल तर माझा कोट त्याला देतो. ऐक रे… अरे ऐक ना. एका गोष्टीसाठी मी थांबलोय. पण वैभव आमच्याकडे येत असेल तर त्याच्यासाठीही मी थांबेल, असं गोगावले यांनी म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिलं.