भाजप नेत्यानं केली राऊत यांची शक्ती कपूरशी तुलना; म्हणाला, ‘हास्यास्पद बाब… आधी’
ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक आणि मारहाणीची घटना घडली. या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त भूमिका घेतली आहे. 'अयोध्या पौळ यांच्यावरील हल्ला म्हणजे डरपोकपणा, समोरासमोर या, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
मुंबई : ठाण्यात काल शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक आणि मारहाणीची घटना घडली. या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त भूमिका घेतली आहे. ‘अयोध्या पौळ यांच्यावरील हल्ला म्हणजे डरपोकपणा, समोरासमोर या, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. त्यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी खडे बोल सुनावले. तसेच राऊत यांचा उल्लेख शक्ती कपूर असा करत खिल्ली उडवली. यावेळी नितेश राणे यांनी, तुझ्यासारखा शक्ती कपूर महिलांच्या अत्याचाराबद्दल बोलतोय मुळात हेच हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे. तर महाविकास आघाडीचे सरकार असताना जे तुझा आणि एका डॉक्टर महिलाचे संभाषण व्हायरल झाले. त्यात तू महिलेला शिव्या देत होतास, ती मर्दानकी होती का असा सवाल केला आहे. तसेच महिला अत्याचारावर तू बोलू नकोस आधी त्या डॉक्टर महिलेला न्याय दे असा खोचक सल्ला दिला आहे.