Pune : हलगर्जीपणा नडला, गर्भवतीचा मृत्यू… दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजी अन् चिल्लर फेक
तनिषा भिसेचे पती भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे आहेत. आमदाराच्या पीएच्या पत्नीचाच दहा लाख रुपये भरले नाही म्हणून मृत्यू झाला. हा सगळा प्रकार पुण्यातील दीनानाथ रूग्णालयात झाला.
भाजप आमदार अमित गोरखे यांच्या यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. घडलेल्या संतापजनक प्रकारानंतर आक्रमक झालेले शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या गेटवर धडकले. यावेळी रुग्णालय प्रशासनाला भेटण्याची त्यांच्याकडून मागणी करण्यात येत असताना पोलिसांनी मात्र त्यांना गेटवर अडवल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आणि त्यांच्यात राडा झाला. दरम्यान, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डीन बाहेर येऊन या सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची भेट घेतली अशा प्रकारचा निरोप पोलिसांकडून देण्यात आला. तर दिनानाथ मंगेशकर रूग्णालया समोर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अडवण्यात आल्याने मोठा राडा यावेळी झाला. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात घोषणाबाजी केली. बघा नेमकं काय घडलं?

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत

‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'

'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली

पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
