शिवसेना संजय राऊतांच्या पाठीशी- किशोरी पेडणेकर

| Updated on: Jul 31, 2022 | 12:53 PM

7 ते 8 अधिकारी या ठिकाणी आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान ही चौकशी सुरु झाल्यानंतर राजकीय वर्तुळात टीका सत्र सुरु चालू झालंय. किशोरी पेडणेकर यांनी देखील यावर भाष्य केलंय.

मुंबई : खा. संजय राऊत यांची गेल्या 5 तासापासून मैत्री या त्यांच्या बंगल्यावर (ED Officer) ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. त्यांच्यासह आता कुटुंबियांचीही देखील चौकशी सुरु असल्याचे समोर येत आहे. असे असतानाच दुसरीकडे दादरमधील त्यांच्या फ्लॅटवरही ईडीचे अधिकारी हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पत्राचाळ प्रकरणी चौकशीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. (Garden Court) गार्डन कोर्ट येथील फ्लॅटवर अधिकारी दाखल झाले असून खाली सुरक्षा रक्षकही तैनात आहेत. त्यामुळे आता येथेही शिवसैनिकांचा गराडा पडणार का हे पहावे लागणार आहे. 7 ते 8 अधिकारी या ठिकाणी आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान ही चौकशी सुरु झाल्यानंतर राजकीय वर्तुळात टीका सत्र सुरु चालू झालंय. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar On Sanjay Raut) यांनी देखील यावर भाष्य केलंय.

 

 

Sanjay Raut: या घटनेकडे महाराष्ट्रातील जनता कशी पाहते हे महत्त्वाचं- बाळासाहेब थोरात
Sanjay Raut: संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्याची शक्यता!