Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde Candidate List : शिंदेंच्या शिवसेनेची यादी जाहीर, 'या' 45 जणांना उमेदवारी, बघा पहिल्या यादीत कोणाला संधी?

Eknath Shinde Candidate List : शिंदेंच्या शिवसेनेची यादी जाहीर, ‘या’ 45 जणांना उमेदवारी, बघा पहिल्या यादीत कोणाला संधी?

| Updated on: Oct 23, 2024 | 10:28 AM

Shiv Sena Eknath Shinde Candidate List for Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. बघा यामध्ये कोणा-कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली वहिली यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. शिंदे गट शिवसेनेकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीतून सर्वात आधी भाजपने आपले उमेदवारी जाहीर केले होते. भाजपने गेल्या रविवारी तब्बल ९९ उमेदवारांची यादी जाहीर केल्याचे पाहायला मिळाले होते. भाजपच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची घोषणा होताच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आपल्या उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार? नेमके कोणते उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अशातच अखेर काल उशिरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ४५ उमेदवारांच्या नावासह शिवेसेनेने आपली पहिली यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईतून ६ जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून यामध्ये २ महिला उमेदवार आहेत. मनीषा वायकर (जोगेश्वरी पूर्व), दिलीप लांडे (चांदीवली), प्रकाश सुर्वे (मागाठाणे), मंगेश कुडाळकर (कुर्ला), सदा सरवणकर (माहिम) आणि यामनी जाधव (भायखळा) यांना संधी देण्यात आली आहे. बघा इतर कोणा-कोणाला मिळाली संधी?

Published on: Oct 23, 2024 10:28 AM