Shivsena Dussehra Melava : शिवाजी पार्क कुणाला? शिंदे गटाच्या वतीनेही आता मध्यस्थी याचिका दाखल, शिंदे गटाच्या याचिकेत काय?

Shivsena Dussehra Melava : शिवाजी पार्क कुणाला? शिंदे गटाच्या वतीनेही आता मध्यस्थी याचिका दाखल, शिंदे गटाच्या याचिकेत काय?

| Updated on: Sep 22, 2022 | 11:58 AM

पालिकेच्या जी वॉर्डमधील सहाय्यक आयुक्तांविरोधात शिवसेनेनं याचिका दाखल केली होती. त्यावर आज शिवसेनेच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे. अशातच आता शिंदे गटाकडूनही नवी याचिका दाखल करण्यात आलीय.

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी, मुंबई : शिवाजी पार्क (Shivaji Park) प्रकरणात शिंदे गटाकडूनही हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्याकडून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. ‘खरी शिवसेना आमचीच, आम्हालाच मेळाव्याची परवानगी द्या’ अशी मागणी मध्यस्थी याचिकेच्या माध्यमातून शिंदे गटाने केलीय. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. अनिल देसाईंनी शिवसेनेला परवानगी मिळावी अशी मागणी करणारी याचिका बुधवारीची हायकोर्टात दाखल केली होती. पालिकेच्या जी वॉर्डमधील सहाय्यक आयुक्तांविरोधात शिवसेनेनं याचिका दाखल केलेली. त्यावर आज शिवसेनेच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे. अशातच आता शिंदे गटाच्या वतीनेही याचिका दाखल करण्यात आली आहे. दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत विलंब केल्याने सेनेनं हायकोर्टात याचिका दाखल केलीय. दरवर्षी शिवसेनेच्या वतीने सदा सरवणकर हे पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज करत होते. त्यामुळे माझ्या अर्जालाच परवानगी दिली गेली पाहिजे, असं सदा सरवणकर यांनी म्हटलंय. आता यावर मुंबई हायकोर्टात नेमका काय युक्तीवाद दोन्ही पक्षांकडून केला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, या आधीच मुंबई महानगर पालिकेनं शिंदे आणि ठाकरे गट या दोघांपैकी कुणालाही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क येथे परवानगी दिली जाणार नाही, असं पत्र पाठवलं आहे. त्यामुळे आता हायकोर्ट पालिकेनं दिलेला निर्णयचं कायम ठेवते की कुणाच्या बाजूने निकाल देते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.