Sanjay Gaikwad : गाडी तोडण्याची शिक्षा कमी, गुणरत्न सदावर्ते यांना संपवायला…, संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य
VIDEO | एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर भाष्य करत असताना मोठं आणि वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांना थेट संपवण्याची भाषा केली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होणार?
बुलढाणा, २६ ऑक्टोबर २०२३ | मराठा क्रांती मोर्चाच्या काही तरूणांनी आज सकाळच्या दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची मोठी तोडफोड केली आहे. तर गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळेच महाराष्ट्रातील गोरगरीब मराठ्यांच्या तोंडाचं आरक्षण हिसकावलं गेलं, अशी खोचक टीका शिवेसनेचे नेते संजय गायकवाड यांनी केली. संजय गायकवाड यांनी मराठा तरूणांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केल्याच्या घटनेवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, याची गाडी तोडली ही शिक्षा कमी आहे. याला संपवायला पाहिजे होतं. हा संपला असता तर मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता. ज्याने कुणी केलं, मी त्याला सांगतो की बाबा कमी झालं. याची जरा व्यवस्था करायला पाहिजे होती, असे म्हणत संजय गायकवाड यांनी हल्लाबोल केला आहे.
Published on: Oct 26, 2023 06:33 PM
Latest Videos