मराठी भाषा भवनावरून उद्धव ठाकरेंची टीका, एक विटही...

मराठी भाषा भवनावरून उद्धव ठाकरेंची टीका, एक विटही…

| Updated on: Mar 23, 2023 | 2:41 PM

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंद-फणवीस सरकारवर निशाना साधला. यावेळी ठाकरे यांनी मराठी भाषा भवनावरून सरकारवर टीका केली

मुंबई : शिवसेनेत उभी फुट पडल्यापासून एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचा खरपूस समाचार उद्धव ठाकरे घेत असतात. आजही ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंद-फणवीस सरकारवर निशाना साधला. यावेळी ठाकरे यांनी मराठी भाषा भवनावरून सरकारवर टीका केली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी, मराठी भाषा भवना निर्णय हा मविआच्या काळातला आहे. त्याबाबत आमच्या सरकारने निर्णय घेत महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषा भवनासाठी पुढाकार घेतला. त्याच्या कामाचे गेल्या गुढीपाडव्याला भूमिपूजनही केले. मात्र या सरकारने या कामात एक विटही लावली नाही. आता तर या मराठी भाषा भवनात काही कार्यालये घातली जाणार आहेत. याबाबत आम्ही आमचे विचार मांडले आहेत. तर संबंधीत मंत्रीदेखिल याबाबत सकारात्मक आहेत. बघू पुढे काय होतं ते.

Published on: Mar 23, 2023 02:41 PM