शिवसेना नेत्यानं संजय राऊत यांचा बापच काढला; अन् म्हणाले, ‘चारीमुंड्या चित नाही केलं तर…’
VIDEO | 'आ रहा है गब्बर', म्हणत शिवसेना नेत्यानं संजय राऊत यांना काय दिलं चॅलेंज
जळगाव : शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत यांच्यावर टीका करताना गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांचा बापच काढला आहे. संजय राऊत यांच्यासह गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव वाघ आणि देवकर यांच्यावरही निशाणा साधलाय. तर जळगाव ग्रामीणमधून पुन्हा मीच आमदार होणार, असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. आ रहा है गब्बर, संजय राऊत यांना फक्त मी एकटा दिसतोय. म्हणून ते थुंकायला लागला. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण मी कधी पाहिलं नव्हतं असं म्हणत या आधी कोणतेहीच राजकीय पक्ष फुटले नाहीत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. तर शिंदे गटातील त्या ४० आमदारांना संपवून टाकू असे म्हणताय, त्याच ४० लोकांनीच मतं दिली म्हणून तुम्ही खासदार झालेत. यावेळी आगामी निवडणुकीत चारीमुंड्या चित नाही केलं, तर बापाचं नाव नाही लावणार, असा इशाराही गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना दिला.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली

गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना

भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
