कोण येतंय-जातंय, फरक पडत नाही, आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावरून शिवसेना नेत्याचा खोचक टोला
आदित्य ठाकरे हे आजपासून कोकण दौऱ्यावर असून आदित्य ठाकरे हे आजपासूनच खळा बैठका घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावरून शिंदे गटाचे नेते आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी खोचक टीका केली आहे. देशात लोकशाही आहे कुणी कुठंही जावं...
नागपूर, २३ नोव्हेंबर २०२३ : आदित्य ठाकरे हे आजपासून कोकण दौऱ्यावर असून आदित्य ठाकरे हे आजपासूनच खळा बैठका घेणार आहेत. आदित्य ठाकरे कोकणवासियांशी अंगणात बसून संवाद साधणार असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावरून शिंदे गटाचे नेते आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी खोचक टीका केली आहे. देशात लोकशाही आहे कुणी कुठंही जावं. मी देखील गडचिरोली आणि वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत. तसंच आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. जर मला रत्नागिरीच्या मतदार संघावर विश्वास नसता तर मी तिथेच थांबून राहिलो असतो. माझ्या मतदारसंघातील जनतेनेच मला आशीर्वाद देऊन या पदावर पोहोचवलं आहे. त्यामुळे माझ्या मतदारांवर माझा विश्वास आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले तर कोण माझ्या मतदारसंघात येतंय जातंय मला काही फरक पडत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.