शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्यावर मनसे कार्यकर्ते भडकले; म्हणाले, ‘मोठं होण्यासाठी…’
VIDEO | शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्या विरोधात मनसे आक्रमक, मनसैनिकांनी दीपाली सय्यद यांच्या बॅनरवर शाईफेक करत केले आंदोलन मनसैनिक घाटकोपरमध्ये आक्रमक दीपाली सय्यद यांची केली कुत्र्याशी तुलना
मुंबई, २६ ऑगस्ट २०२३ | मनसे चांदीवली विधानसभेकडून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. चांदिवली विधानसभेचे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या मतदारसंघात दीपाली सय्यद यांचा कार्यक्रम असल्यामुळे दिपाली सय्यद यांच्या गाड्यांचा ताफा असल्फा मेट्रो स्टेशनच्या रस्त्यावरतून जाणार असल्यामुळे त्यांचा निषेध नोंदवण्याकरता मनसैनिक असल्फा मेट्रो स्टेशन जवळ जमलेले होते. या सर्व मनसैनिकांनी दीपाली सय्यद यांच्या बॅनरवर शाईफेक करत आंदोलन करण्यात आलं. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या आंदोलनाच्या दरम्यान ठेवण्यात आलेला होता आंदोलन सुरू होताच अवघ्या 5 मिनिटात मनसैनिकांची धरपकड पोलिसांकडून करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद या मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर टीका करताना पाहायला मिळत आहे याच मुद्द्यावरून मनसैनिक आक्रमक झालेले होते. त्यानंतर आज मनसैनिक घाटकोपरमध्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो-9 मार्गिकेच्या चाचणीला सुरुवात

अरुणाचल प्रदेशात चीनच्या कुरघोड्या सुरुच, भारतानं खडसावत थेट म्हटलं...

आधी पाकला छुपा पाठिंबा, आता तुर्कस्तान म्हणतंय, चांगल्या वाईट काळात...

तेव्हा मला अजित दादांकडून ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
