Sanjay Shirsat : दरवेळी आम्हाला भीक का मागावी लागते? संजय शिरसाट कोणत्या प्रकरणावरून भडकले?
मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर लक्ष केंद्रीत करताना शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, मराठवाड्याला पाणी मिळाले पाहिजे ही आमची मागणी आहे. न्यायालयाने देखील आदेश दिला आहे, पण काही लोकांचा याला विरोध आहे. या लोकांना संजय शिरसाट यांनी इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर, ५ नोव्हेंबर २०२३ | मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर लक्ष केंद्रीत करताना शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, मराठवाड्याला पाणी मिळाले पाहिजे ही आमची मागणी आहे. न्यायालयाने देखील आदेश दिला आहे, पण काही लोकांचा याला विरोध आहे. या लोकांना संजय शिरसाट यांनी इशारा दिला आहे. तर आमच्या हक्काचं आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाणी द्यावे, अशी विनंती करत यासाठी आम्ही देखील न्यायालयात जाणार असून, वकिलांची फौजी उभी करणार आहोत. आम्हाला आता लढा उभा करावा लागणार आहे, पाण्यासाठी आडवे येत असलेल्यांना हा इशारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर नवीन धरण बनवू नयेत अशी आमची मागणी सांगत आता आम्ही रस्त्यावर उतरणार आहे. आम्हाला रस्त्यावर उतरवावे लागले तरीही मागे पुढं पाहणार नाही, असा इशारा सरकारला दिली आहे.

तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री

मीही मेलो असतो तर.., संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहर म्हणाला

म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी सांगितलं

भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?
