‘फक्त अजितदादा नाही तर संपूर्ण NCP शरद पवार यांच्यासह आमच्यासोबत यायला हवी’, कुणी व्यक्त केली इच्छा?
VIDEO | 'महाराष्ट्रातील जनता संभ्रमात आहे आणि त्यात अशा प्रकारचे स्टेटमेंट शरद पवार यांच्याकडून आलं तर अजून संभ्रम वाढेल', कुणी दिली थेट प्रतिक्रिया
मुंबई, २५ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधी अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली नाही असं विधान केलं आणि अवघ्या पाच तासातच शरद पवार यांनी युटर्न घेतला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या सर्व घडामोडींवर शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील जनता संभ्रमात आहे आणि अशा प्रकारचे स्टेटमेंट शरद पवार यांच्याकडून आलं तर अजून संभ्रम वाढेल. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नोटीस आल्यामुळे अजित पवार आणि शरद पवार गटाला मत सादर करायचं आहे. कदाचित असंही असू शकतं की आमचा पक्ष फुटलेलाच नाही हे निवडणूक आयोगाला दाखवायचं असेल, म्हणून मुद्दामून त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं असेल. काल सुप्रिया सुळे यांनी केलं आणि आज शरद पवार यांनी केले. काहीतरी आपल्या पक्षामध्ये अंतर्गत मतभेद आहे. किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आहे असं निवडणूक आयोगाकडे कळू नये यासाठी कदाचित त्यांनी स्टेटमेंट केले असेल. 60 ते 70 वर्ष राजकीय इतिहास पवार साहेबांचा आहे. त्यामुळे वेगळं काहीतरी राजकीय चातुर्य दाखवण्याचा प्रयत्न असतो, असे शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी म्हटले तर अजित पवार सोबत शरद पवार देखील वेगवेगळे मेळावे घेत आहेत. दरम्यान आमची अशी भूमिका आहे की, फक्त अजित दादा न येता संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांसह यायला हवी ती आमची प्रामाणिक इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील इच्छा आहे. भाजप तर स्वागत करणारच आम्ही देखील स्वागत करूच असेही प्रताप सरनाईक म्हणाले.