सलीम कुत्ता प्रकरणाचे धागेदोरे थेट संजय राऊत यांच्यापर्यंत? शिवसेना नेत्याचं मोठं भाष्य

सलीम कुत्ता प्रकरणाचे धागेदोरे थेट संजय राऊत यांच्यापर्यंत? शिवसेना नेत्याचं मोठं भाष्य

| Updated on: Dec 18, 2023 | 7:02 PM

सलीम कुत्ता प्रकरणाचे धागेदोरे हे संजय राऊत यांच्यापर्यंत असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. इतकंच नाहीतर संजय राऊत यांची चौकशी होईल आणि ते डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच तुरुंगात दिसतील, असेही त्यांनी म्हटलंय

नागपूर, १८ डिसेंबर २०२३ : सलीम कुत्ता प्रकरणी राजकीय नेते नवनवीन दावे करताय. त्यातच आता सलीम कुत्ता प्रकरणाचे धागेदोरे हे संजय राऊत यांच्यापर्यंत असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. इतकंच नाहीतर संजय राऊत यांची चौकशी होईल आणि ते डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच तुरुंगात दिसतील, असं भाष्यही संजय शिरसाट यांनी केले आहे. ज्या पद्धतीने हे सर्व प्रकरण समोर आलंय. सुधाकर बडगुजर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. याप्रकरणी एसआयटी स्थापन झाली आहे, चौकशी केली जात आहे महत्वाचे लिंक यात सापडले आहेत. त्यात कुठेतरी संजय राऊत यांचं कनेक्शन असणार असे म्हणत शिरसाट यांनी असेही म्हटले की संजय राऊत हे गेल्या १० वर्षांपासून नाशिकचे संपर्क प्रमुख आहे. त्यांच्या सतत नाशिकला फेऱ्या सुरू असतात आणि त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये त्यांची देखील चौकशी केली जाईल. मात्र उद्धव ठाकरे यांचे कोणतेही संबंध सलीम कुत्ताशी नाहीये तर संजय राऊत यांचे असल्याचे शिरसाट म्हणाले.

Published on: Dec 18, 2023 07:02 PM