16 MLA Disqualification | उद्या ठाकरे गटाची विधानसभा अध्यक्षांसमोर प्रत्यक्ष सुनावणी, काय ठरली रणनिती?
VIDEO | शिवसेना आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीची तारीख आणि वेळ निश्चित केल्यानुसार उद्या १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी होणार
मुंबई, १३ सप्टेंबर २०२३ | शिवसेना आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीची तारीख आणि वेळ निश्चित केल्यानुसार उद्या १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी होणार आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात उद्या ठाकरे गटाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाच्या ७ आमदारांनी काल वकिलांमार्फत पत्राद्वारे आपलं म्हणणं मांडलं आहे. तर आज बाकी ७ आमदार पत्राद्वारे आपलं म्हणणं मांडणार आहेत. यानंतर हे सर्व एकूण १४ आमदार चौकशी आणि त्यासंदर्भातील सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या सर्वच आमदारांच्या उत्तरांमध्ये एकमत राहण्यासाठी रणनिती देखील ठरल्याची माहिती समोर येत आहे. तर आता उद्या होणाऱ्या या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
Published on: Sep 13, 2023 12:40 PM
Latest Videos