Bharat Gogawale : रायगडचं पालकमंत्री पद भरतशेठ यांच्याकडे गेलं नाही तर… शिंदेंच्या आमदाराचा थेट टोकाचा इशारा
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांचं टार्गेट दिलं होतं. हे 100 दिवस झाले तरीही रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळत नसल्याचे दिसतंय. अशातच शिंदेंच्या आमदाराने थेट इशारा दिला आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून हे पालकमंत्री पद अद्याप रखडलं आहे. यासंदर्भात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना सवाल करतना रायगड जिल्ह्याला पालकमंत्री न मिळणं ही शोकांतिका आहे का? असा सवाल केला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना इशारा दिल्याचे पाहायला मिळाले. ‘अमित शाह रायगडला आल्यानंतर रायगड जिल्ह्याला न्याय मिळेल असं वाटतं आणि तो आमच्या बाजूने असेल आमही आशावादी आहोत’, असं म्हणत महेंद्र दळवी यांनी विश्वास व्यक्त केला आहे. पुढे ते असेही म्हणाले, भरत गोगावले यांच्या रूपाने रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळेल असं वाटतं. अमित शाह रायगडावर येताय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनाला ते येताय. रायगडला न्याय देतीलच कारण शिवरायांचा मावळा हा भरत गोगावले आहेत. रायगडवर नेहमीच अन्याय झालाय. पण आता रायगडला जाग आली असं म्हणता येईल कारण भरत गोगावले यांच्यारूपाने पालकमंत्री पद घोषित होईल आणि जर भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्री पद गेलं नाही तर उठाव नक्की होणार, असा थेट इशारच महेंद्र दळवी यांनी दिला.

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न

भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं

पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला

MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
