‘… मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भुजबळांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक
भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी केली. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा थेट राजीनामाच मागितला आहे.
मुंबई, १ फेब्रुवारी २०२४ : मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि सगेसोयरे यांच्या अधिसूचनेवरूनही मंत्री छगन भुजबळ हे आक्रमक झाले आहेत. त्यावरून शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी थेट भुजबळांकडे मोर्चा वळवला. भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी केली. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा थेट राजीनामाच मागितला आहे. सगेसोयरेविरोधात मंत्री छगन भुजबळ हे सरकारविरोधातच आक्रमक झालेत. सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयाविरोधात बोलायचं असेल तर मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊन बोला, असे शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांनी म्हटलंय. यावरून थेट मंत्री छगन भुजबळ यांनाच विचारणा केली असता त्यांनी नो कमेंट अशीच प्रतिक्रिया दिली आहे. बघा काय यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट….

ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पुन्हा हादरला, लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज; घडल काय

अब पाकिस्तान का जवाब... घुसून मारल्यानंतर बिलावल भुट्टोचा तिळपापड

हा होता पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार, नाव-फोटो समोर, बघा कोणाशी कनेक्शन?

भारताने मोठी चूक केली, प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला... पाककडून धमकी
