छगन भुजबळ यांना वापरलेल्या शिवीगाळीवर संजय गायकवाड म्हणाले, मला जी भाषा येते ती मी…
छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ मारून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, असं आवाहन करत संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. तर भुजबळ त्या मंत्रीपदावर राहण्याच्या लायकीचे नाहीत, संजय गायकवाड यांच्यावक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया काय?
बुलढाणा, २ फेब्रुवारी, २०२४ : शिंदे गट शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एकदा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ मारून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, असं आवाहन करत संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. तर भुजबळ त्या मंत्रीपदावर राहण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांच्या मनात जातीयवाद असेल तर ते मंत्रिमंडळात राहू शकत नाहीत, असेही संजय गायकवाड यांनी म्हणत भुजबळ यांच्यावर टीका केली. तर संजय गायकवाड यांना प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले संजय गायकवाड यांनी वापरलेली भाषा योग्य नाही. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रियेवर संजय गायकवाड यांनी पुन्हा पलटवार केला आहे. जी मला भाषा येते, तिच भाषा मी वापरली, असे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले.
Published on: Feb 02, 2024 06:24 PM
Latest Videos