'तर शिवसेनेचा हिसका दाखवणार', रुक्मिणीबाई रूग्णालयातील 'त्या' प्रकरणावर शिंदे गट आक्रमक

‘तर शिवसेनेचा हिसका दाखवणार’, रुक्मिणीबाई रूग्णालयातील ‘त्या’ प्रकरणावर शिंदे गट आक्रमक

| Updated on: Sep 13, 2023 | 12:19 PM

VIDEO | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलच्या आरोग्य विभागावर मनसेने धडक देत प्रशासनाचा केला निषेध आता शिवसेनाही आक्रमक आणि दिला इशारा, नव्याने दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम न केल्यास..

ठाणे, १३ सप्टेंबर २०२३ | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलच्या गेटवर एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना घडली होती. सध्या हे प्रकरण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर मनसेने आरोग्य विभागावर धडक देत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या महिलेच्या प्रसूतीप्रकरणी मनसेनंतर आता कल्याण पश्चिमेचे स्थानिक शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर हे देखील आक्रमक झाले आहे. त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आपण आमदार म्हणून बाजूला होणार आणि कार्यकर्ते शिवसेना स्टाईलने प्रशासनाविरोधात आंदोलन करतील, असा इशारा आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिला आहे. तसेच केडीएमसीमध्ये नव्याने दाखल झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी फिल्डवर उतरून काम न केल्यास शिवसेना स्टाईल हिसका दाखवण्याचा सज्जड दमही आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिला आहे.

Published on: Sep 13, 2023 12:19 PM