शिवसेनेच नेते शरद पवार यांच्या भेटीला
आजही शिवसेनेचे अनिल देसाई, मंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत आणि सुभाष देसाई यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन भेट घेतली.
महाविकास आघाडीचे राज्यसभेचे उमेदवार जाहीर झाल्यापासून राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठका वाढल्या आहेत. आजही शिवसेनेचे अनिल देसाई, मंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत आणि सुभाष देसाई यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन भेट घेतली. शिवसेनेचे राज्यसभेचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठीच शरद पवार यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यसभेसाठी केले जाणाऱ्या मतदानाविषयी आणि राष्ट्रवादीच्या मतदानाविषयी चर्चा करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी शरद पवार यांनी शिवसेनेच्या नेत्यांनी भेट घेतली असल्याचे सांगितले.
Published on: Jun 09, 2022 11:44 PM
Latest Videos