Shiv Sena Dasara Melava : एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व अन् शिष्यत्व…शिंदे गटाकडून कुठं बॅनरबाजी?
VIDEO | मुंबईतील मातोश्री परिसरासह कलानगर येथे पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यानिमित्त जोरदार बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता शिंदे गटाचा दसरा मेळावा हा आझाद मैदानात होणार आहे. एकनाथ शिंदे काय बोलणार?
मुंबई, २१ ऑक्टोबर २०२३ | मुंबईतील मातोश्री परिसरासह कलानगर येथे पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. दसरा मेळाव्यानिमित्त ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क तर शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदान येथे होणार आहे. यापार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण मुंबईसह ठाणे, दादर या ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरचं विशेष म्हणजे याच ठिकाणी मुंबईच्या मातोश्री परिसरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राहतात त्यांच्याच घरासमोर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. ही बॅनरबाजी करत शिंदे गटाने पुन्हा एकदा डिवचल्याची चर्चा होताना दिसतेय. अवघ्या काही दिवसात दसरा मेळावा होणार आहे त्यामुळे साऱ्याचे लक्ष त्याकडे लागून आहे.
Published on: Oct 21, 2023 02:25 PM
Latest Videos