संजय राऊत म्हणजे निव्वळ फुसका बार, शिंदे गटातील नेत्यानं केला हल्लाबोल
VIDEO | शिंदे गटाच्या नेत्यानं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली सडकून टीका, बघा व्हिडीओ
अहमदनगर : शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्या तोंडी असभ्य भाषा शोभत नाही तर अशा राजकारणासाठी हा नालायक माणूस असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. तर संजय राऊत पोकळ भाषा करणारा व्यक्ती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 2 हजार कोटी घेऊन शिवसेनेचे चिन्ह आणि नाव मिळाल्याचा आरोप त्यांनी केला, मात्र त्यांनी पुरावा दाखवला का असा सवाल त्यांनी केला आहे. तर संजय राऊत म्हणजे निव्वळ फुसकाबार असल्याचा टोला संजीव भोर यांनी लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या सेनेची जी अवस्था झाली ती संजय राऊत यांच्या मुळेच झाल्याचं भोर यांनी म्हटले आहे. तर संजय राऊत हे किती जणांनी चाटतात असे प्रत्युत्तर संजय भोर यांनी दिले आहे.
Published on: Feb 20, 2023 10:50 PM
Latest Videos