महामोर्चावरून शिंदे गटाच्या नेत्याची ठाकरे यांच्यावर एका वाक्यात टीका; म्हणाला...

महामोर्चावरून शिंदे गटाच्या नेत्याची ठाकरे यांच्यावर एका वाक्यात टीका; म्हणाला…

| Updated on: Jun 24, 2023 | 4:56 PM

शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील माजी नगरसेवकांच्या पार पडलेल्या बैठकीत मुंबई महापालिकेविरोधात 1 जुलैला विराट मोर्चा काढण्याची घोषणा केली. त्यावरून आता टीका होताना दिसत आहे. तर ज्यांनी जवळ जवळ 25 वर्षांहून अधिक काळ मुंबई महापालिका आपल्याच ताब्यात ठेवली, त्यांनाच आता आंदोलनाची वेळ आल्याने अनेकांनी खिल्ली उडवली आहे.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेसंदर्भात मोठी घोषणा केली होती. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील माजी नगरसेवकांच्या पार पडलेल्या बैठकीत मुंबई महापालिकेविरोधात 1 जुलैला विराट मोर्चा काढण्याची घोषणा केली. त्यावरून आता टीका होताना दिसत आहे. तर ज्यांनी जवळ जवळ 25 वर्षांहून अधिक काळ मुंबई महापालिका आपल्याच ताब्यात ठेवली, त्यांनाच आता आंदोलनाची वेळ आल्याने अनेकांनी खिल्ली उडवली आहे. शिंदे सरकारकडून महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी आणि भ्रष्टाचारावरून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यावरून शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी टीका करताना ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. तर ज्यानी स्वतः भ्रष्टाचार केला तेच आता महामोर्चा काढणार? यापेक्षा वाईट काय असू शकते असं म्हटलं आहे. तर पटना येथे पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीवर हल्लाबोल करताना, पाऊस पडला की बेडूक येतात, हे असेच आहे. त्यांचा प्रमुख नेता कोण हे ठरलेले नाही, मागच्या वेळीही असेच केले होते पण काही फरक पडला नाही, यह जनता है सब जानती है असा टोला लगावला आहे.

Published on: Jun 24, 2023 04:56 PM