चापट्या हाणल्यानंतर हकालपट्टी! कोण आहे जाधव? काय आहे सुषमा अंधारे मारहाण प्रकरण?
बीड जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव आणि संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांनी आपण मारहाण केल्याच सांगत आहेत. यावरून या दोघांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
बीड : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महाप्रबोधन यात्रा बीडमध्ये पोहोचत असतानाच उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचे प्रकरण समोर आले. मात्र यावेळी अंधारे यांनी आप्पासाहेब जाधव यांनी मारहान केल्याचा दावा फेटाळून लावला. आपल्याला कुठलीही मारहाण झाली नसल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. तर बीड जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव आणि संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांनी आपण मारहाण केल्याच सांगत आहेत. यावरून या दोघांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे महाप्रबोधन यात्रेच्या आधिच ठाकरे गटातील अंतर्गत चापट्या वाद चव्हाट्यावर आला आहे. तर आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर पैसे घेऊन पदे वाटप करत असल्याचा गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याचदरम्यान अंधारे यांनी, एखादा जिल्हाप्रमुखाने महिलेवर हात उचलला, असे जाहीरपणे म्हणतो. त्याला आपल्यावर पोलीस केस होईल याची भीती वाटत नाही. याचा अर्थ या जिल्हा प्रमुखाला शिंदे गट आणि गृह मंत्रालयाचे अभय आहे. त्यातूनच तो तसा बोलतोय असा दावा अंधारे यांनी केला.