...तर तुम्हीही काम करुन मोठं व्हा; किशोरी पेडणेकर

…तर तुम्हीही काम करुन मोठं व्हा; किशोरी पेडणेकर

| Updated on: Sep 10, 2022 | 2:36 PM

भाजपच्या नेत्यांकडून कधीही कामावर बोललं जात नाही मात्र नको त्या गोष्टीकडे लोकांचे लक्ष वेधून नागरिकांचा लक्ष विचलित केलं जात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपची नीती वाईट असल्याचे सांगत मी आज जी काय दिसते आहे ती फक्त माझ्या कामामुळे आहे. माझ्या कामाचाही तुम्हाला त्रास होत असेल, तर तुम्हीही मोठी कामं करा आणि मोठे व्हा असं जाहीर आव्हान किशोरी पेडणेकरांनी भाजपवर पलटवार केला. भाजपकडून नको त्या गोष्टीवरुन टीका केली जात असते. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला यांची कोणतीही तमा न बाळगता त्यांच्यावर टीका केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपकडून वारंवार शिसेनेची बदनामी केली जात असून ज्या फोटोंना कोणातही संदर्भ नाही असे फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल केले जात असल्यानेही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपच्या नेत्यांकडून कधीही कामावर बोललं जात नाही मात्र नको त्या गोष्टीकडे लोकांचे लक्ष वेधून नागरिकांचा लक्ष विचलित केलं जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Published on: Sep 10, 2022 02:36 PM