आमच्या अमृता वहिनीने एक नवीन शोध लावलाय – मनिषा कायंदे
रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. कारण आपण कुटुंबाला वेळ देत नाही, असं मत व्यक्त करत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं.
मुंबई: अमृता फडणीस यांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे आणि ट्राफिकबाबत (Mumbai Traffic) एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता राज्यभरात चर्चा सुरु झालीय. मी रोज सामान्य स्त्री म्हणून घराबाहेर पडते. त्यावेळी मलाही ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. कारण आपण कुटुंबाला वेळ देत नाही, असं मत व्यक्त करत अमृता फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यावर आता शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.