Sanjay Raut | शिवसेनेला हिंदुत्व कोणी शिकवू नये, संजय राऊत भडकले
महाराष्ट्रात आम्ही सत्तेत एकत्र आहोत. यूपीएत सहभागी व्हायचे हा की नाही शिवसेनेचा प्रश्न. आम्हाला आमचा गुगल मॅप माहीत आहे. शिवसेनेला हिंदुत्व कोणी शिकवू नये. 'राज्यपालांच्या विरोधात न्यायालयात जावे लागते हे घटनेचे दुर्दैव. न्यायालय काय निकाल देतंय हे पाहावे लागेल, असेही पुढे राऊत म्हणाले.
मुंबई : मार्शल हे संसदेचे कर्मचारी आहेत. मार्शल काय रिपोर्ट देतात बोलतात हे ठीक आहे. आठ मंत्र्यांनी एकत्र येऊन विरोधी पक्षावर आरोप केले. लोकशाही आम्हाला माहीत आहे. सरकार राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरुन चर्चा न करता पळून गेले. मार्शल बोलवण्याला विरोध नाही. पण ज्या पद्धतीने मार्शलच्या फौजा आणल्या ते चुकीचे आहे. मार्शलनी खासदारांचे गळे दाबायचे बाकी ठेवले होते. विरोधकांच्या विरोधाला न जुमानता बिल पास करण्यात आले. जर आमच्या समोर लोकशाहीची हत्या होत असेल तर आम्ही आवाज उठवायचा नाही का ? सोनिया गांधींना उद्धव ठाकरेंना भेट असतील तर वावग काय ? असे सवाल संजय राऊत यांनी केले आहेत. महाराष्ट्रात आम्ही सत्तेत एकत्र आहोत. यूपीएत सहभागी व्हायचे हा की नाही शिवसेनेचा प्रश्न. आम्हाला आमचा गुगल मॅप माहीत आहे. शिवसेनेला हिंदुत्व कोणी शिकवू नये. ‘राज्यपालांच्या विरोधात न्यायालयात जावे लागते हे घटनेचे दुर्दैव. न्यायालय काय निकाल देतंय हे पाहावे लागेल, असेही पुढे राऊत म्हणाले.