‘सैन्य कशाला हवं, … तरी राऊत पळून जातील’, कुणी उडवली संजय राऊत यांची खिल्ली?
VIDEO | 'दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार... तुम्ही कितीही आव्हानं द्या किंवा दिल्लीतून आर्मी बोलवा आम्हाला काहीच फरक पडत नाही', ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेल्या निर्धावर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी पलटवार करत संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आणि उडवली खिल्ली?
मुंबई, २ ऑक्टोबर २०२३ | ‘गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून आम्ही शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर घेतोय. आता हे बेईमान लोकं यावर दावा सांगत आहे. मराठी माणसाची ताकद कमी करण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे. शिवसेनेच्या लोकांसमोर आव्हान उभं केलं जात आहे पण तुम्ही कितीही आव्हानं द्या किंवा दिल्लीतून आर्मी बोलवा आम्हाला काहीच फरक पडत नाही. दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे.’, असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला तर यावर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. आर्मी बोलवण्याच्या आव्हानावर संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊत यांच्यासाठी सैन्य कशाला हवं, दोन पोलीस पाठवले तरी संजय राऊत पळून जातील, असे म्हणत संजय राऊतांना त्यांनी खोचक टोला लगावला आहे. पुढे संजय शिरसाट असेही म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांनी जे हिंदुत्वाचे विचार मांडले होते. तेच विचार आम्हाला पुढे न्यायचेत म्हणून शिवतीर्थावर आम्हाला मेळावा घ्यायचा आहे.’

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक

नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य

400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं

आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
