Sanjay Shirsat : संजय राऊत स्वतः नशेत असतात… संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
एल्विश यादव या प्रकरणात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर आरोप केले होते. या आरोपांवर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तर ड्रग्जमाफियांकडून पैसे घेणं ही संजय राऊत यांची दुकानदारी असल्याचे म्हणत राऊतांवर सडकून टीका
मुंबई, ४ नोव्हेंबर २०२३ | एल्विश यादव या प्रकरणात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर आरोप केले होते. या आरोपांवर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एल्विश यादववर काही लोकांनी आरोप करायचा प्रकार केलेला आहे, मी जर गुन्हेगार असेल तर माझ्यावर कारवाई करा असं स्वतः यादवने सांगितलं आहे, हिंदुत्वावर बोलणारा लोकप्रिय असणारा माणूस त्याच्यावर कुठलेही आरोप करून त्याला कुठल्याही बाबतीत अडकवायचं हा प्रकार काही लोक करत आहेत, असे संजय शिरसाट म्हणाले तर संजय राऊत हे स्वतःच नशेत असतात आणि ते अशी विधानं करतात, असे म्हणत शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यवर निशाणा साधला आहे. तर ड्रग्जमाफियांकडून पैसे घेणं ही संजय राऊत यांची दुकानदारी असल्याचे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Published on: Nov 04, 2023 02:03 PM
Latest Videos