Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सनी देओलसाठी 24 तासात ही सूत्र हलली, मात्र नितीन देसाई यांना मरू दिलात’; राऊत याचं भाजपवर टीकास्त्र

‘सनी देओलसाठी 24 तासात ही सूत्र हलली, मात्र नितीन देसाई यांना मरू दिलात’; राऊत याचं भाजपवर टीकास्त्र

| Updated on: Aug 27, 2023 | 11:55 AM

सिनेविश्वातील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी काही दिवसांपुर्वी आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या आत्महत्येमागची अनेक कारणे समोर येत गेली. तर त्यांनी कर्जाच्या बोजामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले होते.

मुंबई : 27 ऑगस्ट 2023 | सिनेविश्वातील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतः च्या एनडी स्टुडिओत आत्महत्या केली. त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओतच शेवटचा श्वास घेतला. यानंतर देसाई यांच्या या आत्महत्येमुळे खळबळ उडाली होती. तर त्याचा सध्या तपास सुरू आहे. तर त्यांनी आत्महत्या करण्याआधी सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे दिल्ली येथे जाऊन मदत मागितली होती. पण त्यांच्या पदरी निराशा आल्याने त्यांनी त्यांचे जीवन संपवले.

याचदरम्यान सिनेविश्वाला दुसरा धक्का देणारी बातमी सनी देओल यांच्या बंगल्यावरून आली. ते कर्ज ते फेडू शकले नसल्याने त्यावर जप्तीची नोटीस आली होती. मात्र फक्त परंतु 24 तासात दिल्लीवरून सुत्रे हालली आणि सनी देओल यांच्या बंगल्याचा लिलाव पुढे ढकलण्यात आला. यावरूनच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाना साधला आहे.

यावेळी राऊत यांनी, सनी देओलसाठी एक आणि नितीन देसाई यांच्यासाठी एक असा दुजाभाव केला गेला. सनी देओल प्रमाणेच न्याय नितीन देसाईंना का नाही? नितीन देसाई दिल्लीमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांना भेटले होते. त्यांचा स्टुडिओ वाचविला जावा यासाठी त्यांनी डोळ्यातून पाणी काढलं होतं. त्यांनी, माझं स्वप्न वाचवा अशी विनंती केली होती. मात्र त्यांना तुम्हा वाचाविले नाही. दिल्लीतून येऊन त्यांनी आत्महत्या केली.

सनी देओलला एक न्याय कारण ते भाजपाचे खासदार आहेत स्टार प्रचारक आहेत . आमच्या महाराष्ट्राच्या नितीन देसाईंना वेगळा न्याय. तुम्ही नितीन देसाईला मरू दिलं त्याच्या स्टुडिओचा लिलाव होऊ दिला अशी टीका केली आहे.

Published on: Aug 27, 2023 11:55 AM