Video : राणे पिता-पुत्रांचा राजकीय इन्श्युरन्स संपलाय- विनायक राऊत
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणे पितापुत्रांवर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे (narayan rane), नितेश राणे आणि निलेश राणे यांचा राजकीय इन्श्युरन्स संपलाय तो त्यांनी सांभाळावा, अशी खोचक टीका विनायक राऊत (vinayak raut) यांनी केली आहे. नारायण राणे यांना दीर्घायुष्य लाभो. पण मोदी कृपेने मिळालेलं मंत्रीपद हे जनतेसाठी वापरावं. त्यांनी जनतेला योग्य प्रकारे मदत करावी. […]
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणे पितापुत्रांवर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे (narayan rane), नितेश राणे आणि निलेश राणे यांचा राजकीय इन्श्युरन्स संपलाय तो त्यांनी सांभाळावा, अशी खोचक टीका विनायक राऊत (vinayak raut) यांनी केली आहे. नारायण राणे यांना दीर्घायुष्य लाभो. पण मोदी कृपेने मिळालेलं मंत्रीपद हे जनतेसाठी वापरावं. त्यांनी जनतेला योग्य प्रकारे मदत करावी. नाहीतर हे मंत्रीपद स्वाहा करतील, असा टोलाही त्यांनी लगावला. विनायक राऊत यांनी यावेळी आघाडी सरकार भक्कम असल्याचं स्पष्ट केलं. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. आणखी अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार कायम राहणार आहे. तसेच यापुढील काळातही राज्यात ठाकरे सरकारचा येणार आहे, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला.