Sanjay Raut | यापुढे दिल्लीच्या तख्तासंदर्भात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल : संजय राऊत
शिवसेना महाराष्ट्राची सीमा ओलांडून पुढे जात आहे. यापुढे दिल्लाच्या तख्तासंदर्भातही शिवसेनेची भूमिका महत्त्वाचीच राहील, असं मोठं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. (Shivsena national politics Sanjay Raut)
शिवसेनेच्या 55व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. शिवसेनेने मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा कधीच सोडला नाही. किंबहूना तोच विचार घेऊन शिवसेना पुढे जात आहे, असं सांगतानाच शिवसेना पाच सहा महिन्यात संपेल असं सांगितलं जात होतं. पण अनेक पक्ष आले आणि गेले. शिवसेना महाराष्ट्राची सीमा ओलांडून पुढे जात आहे. यापुढे दिल्लाच्या तख्तासंदर्भातही शिवसेनेची भूमिका महत्त्वाचीच राहील, असं मोठं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांनी आगामी काळात शिवसेना राष्ट्रीय राजकारणात जोमाने उतरणार असल्याचेच संकेत दिल्याने शिवसेनेच्या आगामी भूमिकांकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. (Shivsena Will play major role national politics Sanjay Raut)
Published on: Jun 19, 2021 11:50 AM