डांबरी रस्ता आहे की चादर? म्हणे जर्मन तंत्रज्ञान!; नवीन रस्ता हातानं उचलला, कुठं समोर आला हा प्रकार?

डांबरी रस्ता आहे की चादर? म्हणे जर्मन तंत्रज्ञान!; नवीन रस्ता हातानं उचलला, कुठं समोर आला हा प्रकार?

| Updated on: May 30, 2023 | 4:05 PM

आता अशाच एका कामावर गावकऱ्यांकडून निकृष्ट कामाचा ठपका ठेवत आरोप करण्यात आला आहे. तर थेट निकृष्ट कामाची पोलखोल करण्यात आली आहे. अंबड तालुक्यातील कर्जत-हस्तपोखरी रोडचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येत आहे.

जालना : अनेक ठिकाणी निकृष्ट कामाचा बट्याबोळ आणि कंत्राटदाराच्या मलईवर पाणी सोडण्याचे काम गावकऱ्यांकडून होताना दिसल आहे. गावकऱ्यांनी विरोध केल्याने एकतर काम बंद करावं लागलं आहे. किंवा ते परत करावं लागलं आहे. यासंदर्भात अनेक उदाहरणं समोर येत असतात. आता अशाच एका कामावर गावकऱ्यांकडून निकृष्ट कामाचा ठपका ठेवत आरोप करण्यात आला आहे. तर थेट निकृष्ट कामाची पोलखोल करण्यात आली आहे. अंबड तालुक्यातील कर्जत-हस्तपोखरी रोडचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येत आहे. मात्र डांबर हाताने उखडत गावकऱ्यांनी निकृष्ट काम होत असल्याचा आरोप केला आहे. तर रस्त्याच काम सुरू असतानाच हाताने डांबर निघत असल्याचा समोर आणलं आहे. कर्जत-हस्तपोखरी गावाला जोडनाऱ्या या 8 किमी रोडचे काम सुरू असून खास जर्मन तंत्रज्ञाने हा रस्ता केला जात असल्याचा दावा देखील केला जातोय.

Published on: May 30, 2023 04:05 PM