मुख्यमंत्री शिंदे यांच्या परभणी दौऱ्याआधीच ग्रामस्थांचं अनोखं शोले स्टाईलने आंदोलन; नेमकं कारण काय?
राज्यात सध्या रस्त्यावरून आंदोलनं केली जात आहे. कोकणात जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून मनसेकडून जागर पदयात्रा केली जात आहे.
परभणी : 27 ऑगस्ट 2023 | राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते हेच वाहनचालकांना कळत नाही. यातून अपघात ही होतात. त्यामुळेच आचा महाराष्ट्र नव निर्माण सेनेकडून सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला गेला आहे. मनसेकडून मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून मनसेकडून जागर पदयात्रा काढलेली आहे. याची राज्यभर चर्चा सुरू आहे. मात्र सध्या चर्चा सुरू आहे ती परभणीत सुरू असणाऱ्या आंदोलनाची.
परभणीच्या पूर्णा तालुक्यातील माहेर येथील गावात जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यासाठी गेली अनेक वर्षे ते मागणी देखील करत आहेत. मात्र त्यांची ही मागणी आजही पुर्ण झालेली नाही. म्हणून येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे यांच्या परभणी दौऱ्याआधी आंदोलन केले आहे. ग्रामस्थांनी केलेल्या शोले स्टाईलने आंदोलनाची सध्या चर्चा होत आहे.
शासन आपल्या दारी कार्यक्रमांसाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्याचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले. तर चिखलात बसून प्रशासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा

मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?

'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत

धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
