ऑपरेशन कमळ हा आमदार खरेदी विक्रीचा उद्योग!, कोणी केली टीका?

“ऑपरेशन कमळ हा आमदार खरेदी विक्रीचा उद्योग!”, कोणी केली टीका?

| Updated on: Jun 26, 2023 | 11:06 AM

सांगलीत काल काँग्रेसचा महानिर्धार मेळावा पार पडला. यावेळी कर्नाटकमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. दरम्यान सिद्धरामय्या यांनी बोलताना भाजपवर जोरदार निशाणा साधला.

सांगली: सांगलीत काल काँग्रेसचा महानिर्धार मेळावा पार पडला. यावेळी कर्नाटकमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. दरम्यान सिद्धरामय्या यांनी बोलताना भाजपवर जोरदार निशाणा साधला. “महाराष्ट्रातील शिदे-फडणवीस सरकारदेखील भ्रष्ट आहे. शिंदे-फडणवीस सरकारला महाराष्ट्रातुन कोणत्याही परिस्थितीत नेस्तनाबूत करून उखडून टाकल पाहिजे. देशात असो किंवा राज्यातील भाजप सरकार, त्यांचं विकासाचं धोरण नाही,फक्त एक उद्योग आहे. तो म्हणजे लाच घेणं आणि लाच देणं हाच उद्योग आहे.मुळासकट भाजपला फेकून देण्याची गरज आहे. ती जबाबदारी सर्वांची आहे. कर्नाटकमध्ये आम्ही भाजपला मुळासकट फेकून दिलं आहे. कर्नाटक राज्यात भाजप कधीही जनतेच्या आशीर्वाद घेऊन निवडून आली नाही. केवळ ऑपरेशन कमळ आणि आमदार खरेदी ते करून सत्तेवर आले,” असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 26, 2023 11:06 AM