sikander sheikh : पुन्हा लाल मातीत भिडणार सिकंदर शेख आणि महेंद्रसिंग गायकवाड? कुणी दिलं आमंत्रण?
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान महेंद्रसिंग गायकवाड यांच्यात सुरू झालेल्या कुस्तीच्या वादावर पडदा टाकण्यासाठी सांगलीची अंबाबाई तालीम संस्था पुढे आली आहे.
सांगली : पुणे ( PUNE ) येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी ) MAHARASHTRA KESARI ) स्पर्धेच्या सेमी फायनलमधून सिकंदर शेख ( SIKANDAR SHEIKH ) बाद झाला. त्यानंतर सोशल मीडियावर सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याची अनेकांनी टीका केली. त्यानंतर पंचांनाही धमकी देण्यात आली होती.
पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्रसिंग गायकवाड यांच्यातील ‘या’ वादावर तोडगा म्हणून लवकरच सांगलीत मातीतील कुस्ती होणार आहे. अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे वस्ताद यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
सिकंदर शेख आणि महेंद्रसिंग गायकवाड यांच्यात सांगलीत मातीतील कुस्ती आयोजित करण्यात आहे, अशी माहिती अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे वस्ताद यांनी दिली आहे. या कुस्तीसाठी सिकंदर शेख याने तयारी दर्शवली आहे. तर, महेंद्रसिंग यांच्याशी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.