संजय राऊत जगातील सर्वात विद्वान व्यक्ती, त्यांना कुणी स्पर्धकच नाही; शिवसेनेच्या मंत्र्याचा उपरोधात्मक टोला

संजय राऊत जगातील सर्वात विद्वान व्यक्ती, त्यांना कुणी स्पर्धकच नाही; शिवसेनेच्या मंत्र्याचा उपरोधात्मक टोला

| Updated on: Apr 27, 2023 | 2:07 PM

Sindhudurg News : संजय राऊत हे देशातील सगळ्या विद्वानांचे महामेरू बनलेत, असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी टोला लगावला आहे. पाहा व्हीडिओ...

सिंधुदुर्ग : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. सामंतांनी संजय राऊत यांना उपरोधात्मक टोला लगवला आहे. “संजय राऊत हे जगातील सगळ्यात शहाणे आणि विद्वान आहेत. त्यांच्या समोर स्पर्धक म्हणून जगात एकही विद्वान शिल्लक राहिला नाही. देशातील सगळ्या विद्वानांचे राऊत हे महामेरू बनलेले आहेत. जगातील विद्वानांपेक्षा राऊत यांना जास्त अक्कल आहे”, अशी उपरोधात्मक टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. संजय राऊत यांनी सरकारी कागद दाखवून शहाणपण दाखवू नये, असंही ते म्हणालेत. आज दुपारी 4.30 ला मंत्री उदय सामंत यांची जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद होणार आहे. इथं ते नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे.

Published on: Apr 27, 2023 02:02 PM