शिक्षणासाठी जीव धोक्यात! जीव मुठीत घेऊन कुठं सुरूये विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास?

शिक्षणासाठी जीव धोक्यात! जीव मुठीत घेऊन कुठं सुरूये विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास?

| Updated on: Jul 28, 2023 | 7:33 AM

VIDEO | जीव धोक्यात घालून विद्यार्थी घेताहेत शिक्षण, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी दिला नदीत बसून आंदोलनाचा इशारा

बुलढाणा, 28 जुलै 2023 | बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील जळगाव आणि पिंपळगाव या गावांच्या मधून एक नदी वाहत आहे. या नदीवर पूल व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून दोन्ही गावातील ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत, मात्र अजूनही या नदीवर पूल होत नसल्याने या नदीपात्रातून जीव धोक्यात घालून विद्यार्थी शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जात आहेत. जळगाव आणि पिंपळगाव या दोन्ही गावच्या मधून आमना नदी वाहते, जळगाव मधील शेकडो विद्यार्थी पिंपळगाव येथील शाळेत शिक्षण घेत आहेत, तर दोन्ही गावांतील ग्रामस्थ व्यवहार आणि नातेसंबंध असल्याने नेहमीच ये-जा करतात, एकूणच काय तर या गावांना आमना नदीचे पात्र ओलांडून जावे – यावे लागते, नदीला पूर आल्यानंतर दोन्ही गावातील नागरिक अडकून पडतात, या नदीवर पूल व्हावा यासाठी गावकरी मोठा प्रयत्न करत आहेत, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनाही या संदर्भात निवेदने देण्यात आले आहेत, परंतु अजूनही हा पूल होत नसल्याने विद्यार्थ्यांना या नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे भविष्यात जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Published on: Jul 28, 2023 07:33 AM