मुख्यमंत्री शिंदे यांच्या सहा महिन्याच्या स्क्रिप्टवर राष्ट्रवादीच्या नेत्याची खरमरीत टीका

मुख्यमंत्री शिंदे यांच्या सहा महिन्याच्या स्क्रिप्टवर राष्ट्रवादीच्या नेत्याची खरमरीत टीका

| Updated on: Mar 31, 2023 | 8:55 AM

शिंदे मागिल सहा महिन्यात असं केलं तसं केलं म्हणतात, मात्र सहा महिन्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता असा घणाघात त्यांनी केला.

नाशिक : सिन्नर येथील कार्यक्रमात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खरमरीत टीका केली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्ष नेते अजित पवार उपस्थिती होते. यावेळी आव्हाड यांनी, शिंदे यांच्या मागील 6 महिन्याच्या स्क्रिप्टवर टीका केली.

आव्हाड यांनी, शिंदे यांची टींगल करत, सहा महिन्यापूर्वी असेच ऑपरेशन केलं, सहा महिन्यापूर्वी असेच षटकार मारले, कबड्डी खेळायला गेले आणि सहा महिन्यापूर्वी आम्ही अशाच तंगड्या खेचल्या. शिंदे मागिल सहा महिन्यात असं केलं तसं केलं म्हणतात, मात्र सहा महिन्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता असा घणाघात त्यांनी केला.

Published on: Mar 31, 2023 08:46 AM