…नाहीतर गौतमी पाटील हिनं बिहारला जावं, छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनं पुन्हा डिवचलं अन् दिलं चॅलेंज
VIDEO | 'आता ताईला समजून सांगणे गरजेचे आहे नाहीतर...', घनश्याम दरोडे यांनी काय दिला गौतमी पाटीलला इशारा
मुंबई : “महाराष्ट्र चांगला घडवायचा असेल तर महाराष्ट्राची संस्कृती राखली पाहिजे. गौतमी पाटील यांनी पाटील आडनाव लावावे. त्याला माझा विरोध नाही तर त्या ज्या पद्धतीने अदा करतात, त्याला माझा विरोध आहे. पाटील आडनाव लावण्याचा ज्याला त्याला पूर्ण अधिकार आहे. गौतमी पाटील यांना आडनावरून कोणी विरोध करू नये, आपले अधिकार आपण ठरू शकतो”, असं महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे म्हणाला. मी गौतमी पाटील यांना ओपन चॅलेंज करतो, त्यांनी आमचा मुसंडी सिनेमा पाहावा, तेव्हा तुम्हाला कळेल महाराष्ट्राची संस्कृती काय आहे. गौतमी पाटील यांना बोलण्यात काही अर्थ राहिला नाही, बोलून काही त्या प्रतिसाद देत नाही. आता 9 जून नंतर मी त्यांची भेट घेणार आहे, असं घनश्यामने सांगितलं. तर आता ताईला समजून सांगणे गरजेचे आहे, नाहीतर मी ताईला ओपन चॅलेंज देतो त्यांनी बिहारमध्ये जावं. तुम्ही बदल करणार नसाल तर महाराष्ट्रात तुम्हाला थारा नाही. गौतमी पाटील यांची महाराष्ट्रात जास्त दिवस हवा राहणार नाही. कारण तुम्ही पोरांना वेगळ्या वळणाला लावत आहे, वाईट वळण लावत आहे”, असा आरोप घनश्यामने केला. 9 तारखेनंतर मी गौतमी पाटील यांची भेट घेणार आहे. महाराष्ट्राच्या वतीने त्यांना समजून सांगणार आहे. त्यांना बदल करायला सांगणार आहे. महाराष्ट्र चांगला घडवायचा असेल तर महाराष्ट्राची संस्कृती एक राहिली पाहिजे, असं देखील तो यावेळी म्हणाला.
“