‘यू आर नॉट इंडिया’, मणिपूर मुद्यावरून स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधी यांचा समाचार

‘यू आर नॉट इंडिया’, मणिपूर मुद्यावरून स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधी यांचा समाचार

| Updated on: Aug 09, 2023 | 2:22 PM

VIDEO | राहुल गांधी यांनी संसदेत मणिपूर मुद्यावर आक्रमक भाषण केल्यानंतर स्मृती इराणी राहुल गांधी यांच्यावर संसदेत कडाडल्या

नवी दिल्ली, ९ ऑगस्ट २०२३ | आज संसदेत मणिपूर मुद्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली असे भाष्य केले. यावरूनच केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा खरपूस चांगलाच समाचार घेतला. ‘यू आर नॉट इंडिया’ असे म्हणत स्मृती इराणी यांनी राहुल गांधीवर जोरदार हल्लाबोल केला. “देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भारत मातेची हत्या केली, असं बोललं गेलं. काँग्रेस पक्ष त्यावेळी इथे टाळ्या वाजवत होता. भारत मातेची हत्या झाली, बोलल्यावर टाळ्या वाजवण्यात आल्या. यावरुन दिसून येतं, कोणाच्या मनात गद्दारीची भावना आहे. मणिपूर विभाजीत नाही तर तो देशाचा अविभाज्य भाग आहे” असे स्मृती इराणी यांनी सभागृहात म्हटलं.

Published on: Aug 09, 2023 02:22 PM