धर्म परिवर्तनाविरोधात विद्यार्थी आणि हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर; ‘या’ जिल्ह्यात उमटले तिव्र पडसाद

धर्म परिवर्तनाविरोधात विद्यार्थी आणि हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर; ‘या’ जिल्ह्यात उमटले तिव्र पडसाद

| Updated on: Jun 12, 2023 | 12:35 PM

गेल्या काही दिवसात छत्रपती संभाजीनगर, बीड, नवी मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये औरंगजेबाचे उद्दातीकरणावरून तणावाची स्थिती झाली होती. तर कोल्हापुरात दंगलीसारखी परिस्थिती उद्भवली होती. याचदरम्यान आता मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

मालेगाव : राज्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट करण्याचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसात छत्रपती संभाजीनगर, बीड, नवी मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये औरंगजेबाचे उद्दातीकरणावरून तणावाची स्थिती झाली होती. तर कोल्हापुरात दंगलीसारखी परिस्थिती उद्भवली होती. याचदरम्यान आता मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. येथे ‘करिअर गाईडन्स’च्या नावाखाली इतर धर्मीय मुलांना मुस्लिमांप्रमाणे शिक्षण करण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहे. त्यानंतर पोलिसांनीही महाविद्यालय प्रशासन, उपप्राचार्यासह आयोजकांवर गुन्हा दखल केल. यानंतर आता येथे घटनेचे पडसाद उमटलेत. महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाचे विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. विद्यार्थी आणि काही हिंदुत्ववादी संघटनांची जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Published on: Jun 12, 2023 12:35 PM