सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक
सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. काल 700 ते 800 ट्रक कांदा आला आहे. पाहा व्हीडिओ...
सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. काल 700 ते 800 ट्रक कांदा आला आहे. त्यामुळे लिलावाला उशीर होणार आहे. काल आलेला कांद्याचा लिलाव अद्याप पूर्ण झाला नाहीये. त्यामुळे आज नव्याने आलेल्या कांद्याचे ट्रक अद्याप मार्केट यार्डबाहेरच थांबून आहेत. कालचा आणि आजचा कांदा घेऊन आलेल्या वाहनांमुळे मार्केट यार्डात चक्काजाम झाला आहे.
कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने लिलाव दुपारी दोन ते तीन वाजता सुरू होण्याची शक्यता आहे.
Published on: Jan 24, 2023 12:24 PM