वादळी वार्‍यानं झोडपलं, झाडे उन्मळून पडल्याने पत्र्याची शेड कोसळले

| Updated on: Jun 06, 2023 | 7:09 AM

VIDEO | राज्यात कुठं बसला मान्सून पूर्व पावसाच्या वादळी वाऱ्याचा फटका, नागरिकांची तारांबळ

सोलापूर : मे महिन्यातील उन्हानं वैतागलेल्या नागरिकांची प्रतिक्षा संपणार आहे, कारण लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविली जात आहे. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर लवकरच महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री होणार असल्याचं हवामान खात्यांन म्हटलं आहे. मात्र राज्यात काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसानं चांगलंच झोडपून काढले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढ्याला वादळी वाऱ्याचा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. सोलापुरातील माढा शहरासह ग्रामीण भागातील म्हेसगाव, कापेसवाडीत वादळी वाऱ्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकर्‍याची धांदल उडाली. मान्सून पूर्व सुरू असलेल्या या पावसाच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक वर्षाची झाडे उन्मळून पडली आहेत. तर झाडे पडून पत्र्याची शेड जमीनदोस्त झाली आहेत. यामध्ये सुदैवाने तालुक्यात कुठेही दुर्घटना घडलेली नाही. शेतकरी आणि नागरिकांकडून या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्याची मागणी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विनंती कऱण्यात येत आहेत.

Published on: Jun 06, 2023 07:09 AM
जेजुरी विश्वस्त निवडीचा वाद चिघळला! ग्रामस्थ आंदोलनकर्ते हायकोर्टात जाणार
बीडच्या तरुणाकडून थेट लग्नाची मागणी अन् गौतमी पाटील स्पष्टच बोलली…