सोलापुरात मध्यरात्री पावसाची हजेरी; आजचं तापमान किती?
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मध्यरात्री पावसाने हजेरी लावली.
सोलापूर : राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडतोय. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही मध्यरात्री पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकड्याने हैराण झालेले सोलापूरकर पावसामुळे सुखावले आहेत. मात्र मध्यरात्री आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. हवामान विभागाने 13, 14 आणि 15 एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला होता. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार दिवसभर ढगाळ वातावरण होतं. तर मध्यरात्री पावसाची हजेरी लावली. तर सोलापूरचं आजचं तापमान 40.8° सेल्सिअस आहे. त्यामुळे एकीकडे कडाक्याचं ऊन तर दुसरीकडे अवकाळी पावसाच्या सरी असं सोलापुरात वातावरण आहे.
Published on: Apr 15, 2023 09:25 AM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

