Pankaja Munde | Eknath Shinde यांच्या बंडखोरीवर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

Pankaja Munde | Eknath Shinde यांच्या बंडखोरीवर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

| Updated on: Jun 21, 2022 | 8:22 PM

सध्या तरी महाराष्ट्रातील यंत्रणेत मी नसल्यामुळे या विषयावर भाष्य करणं योग्य नाही. तर जे सुरू आहे तो महाराष्ट्र बघत आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

अहमदनगरः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यात राजकीय भुकंप घडवून आणला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) सध्या अल्प मतात आल्याचे दिसत आहे. तर भाजपकडून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. तर शिवसैनिकांकडून शिंदे यांच्यावर टीका होत आहे. यादरम्यान त्यांची मनधरनी करण्यासाठी मिलींद नार्वेकर गेले आहे. तर राज्यात उद्भवलेल्या सध्याच्या परिस्थितीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्या म्हणाल्या, सध्या तरी महाराष्ट्रातील यंत्रणेत मी नसल्यामुळे या विषयावर भाष्य करणं योग्य नाही. तर जे सुरू आहे तो महाराष्ट्र बघत आहे. त्या बीडमधील आष्टी आणि अहमदनगरमधील पाथर्डी दौऱ्यावर असताना बोलत होत्या. तसेच यावेली मुंडे यांनी, ज्या घडामोडी घडतायत त्यावरून महाराष्ट्र राजकीय भूकंपाच्या दिशेने वाटचाल करतोय, असंच दिसतं असल्याचं म्हटलं आहे.

Published on: Jun 21, 2022 08:22 PM